Category Archives: मधल्या वेळचे पदार्थ

मधल्या वेळचे पदार्थ | Snacks Recipes

कोबी मुठिया

कोबी मुठिया

कोबी मुठिया

साहित्य :

  • १ कप किसलेला कोबी
  • १ कप ज्वारीचे पीठ
  • ५ टे. स्पू. लो फॅट दही
  • १ टे. स्पू. कोथिंबीर
  • लिंबूरस
  • १ टी. स्पू. मिरची-आले पेस्ट
  • १ टी. स्पू. लसूण पेस्ट
  • चिमूटभर सोडा
  • मीठ
  • साखर
  • हळद
  • १ टी. स्पू. तेल
  • हिंग
  • जीरे
  • कढीपत्ता

कृती :
कोबी व मुठियाचे इतर साहित्य एकत्र करुन रोल करुन वाफवावे. तुकडे करुन तेलात जीरे, हिंग, कढीपत्ता घालून परतावे. कोथिंबीर पेरुन गरम खायला द्यावे.