Category Archives: भाज्या

भाज्या | Vegetable recipes

व्हेज सीग कबाब

व्हेज सीग कबाब

व्हेज सीग कबाब

साहित्य :

 • १ वाटी शिजवलेले हिरवे वाटाणे
 • २ उकडलेले बटाटे
 • १ किसलेले गाजर
 • १ किसलेला बीट
 • २ टे. स्पू. पुदिन्याची पानं
 • २ टे. स्पू. चिरलेली कोथंबीर
 • आलं-लसुण-हिरवी मिरचीची पेस्ट
 • १ टी.स्पू. आमचूर पावडर
 • १ टी.स्पू. कसूरी मेथी
 • मीठ
 • अर्धी वाटी ब्रेडचा चूरा
 • तेल.

कृती :

वरील सर्व साहित्य एकत्र करुन चांगले मळून घ्या. मिश्रण थोड घट्ट असावं. लोखंडी सीगवर हे मिश्रण दाबुन लावा. सीगं सेफ ग्लास ट्रे किंवा नॉनस्टिक ट्रे वर ठेवून वरुन थोडे तेल सोडून खरपूस ग्रिल करा.