लोगटोक सरोवर

‘लोगटाक’ सरोवर मणिपूर राज्यामध्ये आहे.

लोगटोक :- हे सरोवर मणिपूर नदीचे उगमस्थान आहे. त्याचे १०४ चौ. कि.मी. क्षेत्रफळ हे मणिपूर खोऱ्याचा सर्वात महत्त्वाचा डोळ्यात भरणारा भाग होय. येथून निघणारी मणिपूर नदी दक्षिणेकडे वाहत जाऊन म्यानमारमध्ये प्रवेश केल्यानंतर चिंदविन नदीची एक उपनदी मियिठा हिला मिळते.