लोणार

लोणार : (जि. बुलडाणा) लोणार सरोवर म्हणजे निसर्गाचा आगळा वेगळा चमत्कार होय. उल्कानिर्मित सरोवराचे अशिया खंडातील एकमेव स्थान व जगातील अशा प्रकारच्या चार स्थानपैकी एक स्थान सहस्त्रावधी वर्षांपूर्वी आकाशातून एक प्रचंड उल्का पडल्यामुळे १८०० मीटर व्यासाचे व १७० मीटर खोल असे प्रचंड वर्तुळाकार विवर येथे निर्माण झाले हे उल्कानिर्मित विवर खाऱ्या पाण्याने भरलेले आहे.

सभोवती व गावात सर्वत्र गोड पाणी आढळते. सतत पडत असलेली गोमुखातून धार हा येथील दुसरा चमत्कार आहे. या धारेचा उगम गंगा नदीत आहे असे समजले जाते.