मग त्याचे घरही मोठे झाले

इंग्लडमधील एक नामवंत कायदेपंडीत व निबंधकार फ़्रान्सीस बेकन याला एलिझाबेथ राणीने लॉर्ड या पदवीने विभूषीत केले.

एकदा स्वत: राणी बेकनच्या घरी गेली व त्याचे घर पाहून म्हणाली, बेकनसहेब, तुमचं घर फ़ारच लहान आहे हो?

यावर बेकन म्हणला, राणीसाहेब, वास्तविक माझ घर पूर्वी माझ्यासारख्याला पुरेसं होतं, पण आपण मला लॉर्ड बनवून मोठे केल्यामुळे, आता ते माझ्या दर्जाच्या मानानं लहान ठरु लागलं आहे.

बेकनचे हे चातुर्यपूर्ण उत्तर ऎकून राणी खूष झाली व तिने त्याला घर वाढविण्यासाठी बक्षीस म्हणून पैसे दिले. त्यामुळे त्याच्या पाठोपाठ त्याचे घरही मोठे झाले.