मगदाचे लाडु

साहित्य :

  • ५०० ग्रॅम हरबऱ्याच्या डाळीचे पीठ
  • ५०० ग्रॅम साखर
  • २५० ग्रॅम डालडा
  • ८-१० वेलदोड्याची पूड
  • थोडे केशर
  • बदामाचे काप

कृती :

जाड बुडाच्या पातेल्यात डाळीचे पीठ घालून खमंग भाजावे. चांगला वास आला की उतरवून ठेवावे. थंड होऊ द्यावे.साखरेत थोडे पाणी घालून पाककरायला ठेवा. सतत ढवळत राहा. साखरेचा पाक होत होत पुनः त्याची साखर बनायला लागते. मग खाली उतरवावे. नंतर ही साखर वाटून घ्या व वरील भाजलेल्या पिठात मिसळा. वेलदोड्याची पूड, बदाम-पिस्त्याचे कप व केशर घालून मिश्रण नीट कालवा व लाडू वळा. साखर पुनः वाटण्याचा खटाटोप वाटला तरी हे लाडू चवीला फार सुंदर लागतात. रामनवमीच्या पारण्याल प्रसादासाठी मुद्दाम करण्यायोग्य आहे.