महालक्ष्मीची आरती

महालक्ष्मीची आरती

महालक्ष्मीची आरती

ओं नमो आद्यरूप देवी भगवती माते ।
कालिका कामरूप शक्ति तूं जगन्माते ॥
वैष्णवी भूतमाया नमो मूळपीठदेवते ॥
झालिया भेटि तुझी निवारसी पापातें ॥१॥

जय जय श्रीकुळदेवते ॥
महालक्ष्मी ग माते ॥ आरती घेऊनियां ओंवाळीत मी तूतें ॥धृ०॥

अंबिका भद्रकाली देवी आद्या कुमारी ॥
मारिले चंडमुंड महिषासुर हे वरी ॥
हर्षले देवद्विज गाती जयजयकारी ॥
उजाळुनी दीपमाळा ओंवाळिती नरनारी ॥ जय०॥२॥

परिधान हेमवर्ण कंठीं नवरत्ने हार ॥
करातळ रातोत्पलें अद्‌भूत जयजयकार ॥
अवतार कोल्हापुरी केला प्रताप थोर ॥
मारिले दैत्य विकट अघट कोल्हापुर जय० ॥३॥

नासिकीं मुक्ताफळें रत्नकुंडलें श्रवणी ॥
घवघवीत नेपुरें अंदु वाजती चरणीं ॥
मस्तकीं पुष्पहार दिसे भासे वदनीं ॥
पौर्णिमा चंद्रबिंब पृष्ठीवरी रूळे वेणी ॥जय०॥४॥

नवकोटी कात्यायना च्तुःषष्टी योगिनी ॥
भूचरां जळचरां आई तुजपासूनी ॥
ऐसी तूं महालक्ष्मी जगताची जननी ।
नामया विष्णुदास तुझें चिंतन भ्यानी ॥
जय जय श्रीकुळदेवते ॥ महालक्ष्मी ग माते ०॥५॥