Category Archives: मराठी पुस्तके

मराठी पुस्तके | Marathi Books

वसंत लिमये यांचे लॉक ग्रिफिन

लॉक ग्रिफिन

लॉक ग्रिफिन

‘मराठीत कादंबरी लेखनात फारसे प्रयत्न होत नाहीत,’ ‘मराठी लेखक संशोधन करण्याचा प्रयत्न करीत नाहीत, कष्ट घेत नाहीत,’ अनेकवेळा असे आरोप केले जातात. पण हे आरोप पुसून टाकण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांत मराठी लेखकांनी केले आहे. या यादीमध्ये आता एका नव्या लेखकाचे नाव पडणार आहे.

वसंत लिमये जे चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे आहेत यांनी आतापर्यंत स्तंभलेखनाबरोबरच विविध लेख लिहीले आहेत. त्यांनी नुकतीच एक कादंबरी लिहीली आहे व ‘ग्रंथाली’ तर्फे ती प्रकाशीत करण्यात येणार आहे. दणदणीत पृष्ठसंख्येची तर ही कादंबरी आहेच पण त्यामध्ये त्यांनी तीन पिढ्यांचा वेध घेतला आहे. हे करतानाही त्यांनी अर्थातच बदलत्या काळाचाही वेध घेतला आहे. या कादंबरीचे नाव आहे ‘लॉच ग्रिफिन’. पण ही कादंबरी केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नाहीये. लिमये यांनी ही कादंबरी राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संदर्भ घेत, गेल्या ८० वर्षांत ज्या-ज्या घटना घडल्या त्यांच्या पार्श्वभूमीवर कादंबरी लिहीली आहे. तीन पिढ्यांची वाटचाल तर त्यांनी मांडलीच पण त्याचबरोबर कौटुंबिक संबंध, राजकारण, आंतरराष्ट्रीय पातळीवरील बदल या साऱ्यांची गुंफण केली आहे. लिमये यांनी या कादंबरीसाठी पाच वर्षं मेहनत घेतली. आपल्या कादंबरीची वर्णने आणि तपशील सांगताना चूक होऊ नये यासाठी लिमये यांनी दोन वेळा अमेरिकेचा प्रवास केला. भारतात अनेक ठिकाणी त्यांनी भ्रमंती केली व अनेकांना ते भेटले. कल्पित आणि सत्य घटनांची सांगड घालतानाच लिमये यांनी एक अद्भुत जग निर्माण केले आहे. सामान्य माणसाच्या घरात सुरु होणारे हे कथानक एकदम आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं जातं, हे त्यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. हे कथानक आपल्याला भारत, अमेरिका आणि ब्रीटन या तीन देशांत घेऊन जाते.

३० जूनला या कादंबरीचे प्रकाशन आहे. या कादंबरीचे प्रकाशन वेगळ्या पद्धतीने व्हावे, असे लिमये यांना वाटते. या कादंबरीचे प्रकाशन एक नाट्यप्रवेश सादर करताना केला जाईल. www.lochgriffin.in  ही कादंबरीची वेबसाईट लिमये यांनी तयार केली आहे.