Category Archives: धार्मिक ठिकाणे

धार्मिक ठिकाणे | Dharmik Places

गुरुजी तालीम मंडळ पुणे

गुरुजी तालीम गणपती, पुणे

गुरुजी तालीम गणपती, पुणे

गुरुजी तालीम हा मानाचा तिसरा गणपती. सुरवातीला हा गणपती बुधवार पेठेतल्या तालमीत बसवण्यात येत होता.

सध्या तालीम असित्तवात राहिलेली नासल्याने लक्ष्मी रोडवरच्या गणपती चौकात हा गणपती बसवण्यात येतो.

या मंडळाची सुरवात दोन हिंदु आणि मुस्लीम पारिवारांनी केली.

भिकू शिदे आणि उस्ताद नलबन या दोघांनी या गणपती मंडळाची सुरवात केली. म्हणूनच हा गणपती हिंदू मुस्लिम एक्येचं प्रतिक मानला जातो.

१८८७ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली. टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रुप देण्याआधीच या मंडळाची स्थापना करण्यात आली होती.

शतक महोत्सव साजरं करणारं हे पुण्यातलं हे पहिलं गणपती मंडळ आहे. विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदा गुलाल उधळणारं मंडळ अशी त्याची ख्याती आहे.

या गणपतीला सुवर्ण आभूषणे आहेत तसेच या वर्षी मंडळाने फायबरच्या गणेशमुर्तीची स्थापना केली आहे.

गुरुजी तालीम मंडळ पुणे फोटो