Category Archives: महाराष्ट्रातील जिल्हे

महाराष्ट्रातील जिल्हे | Districts of Maharashtra State

अहमदनगर जिल्हा

इ. स. १४१८ मध्ये मलिक अहमद याने वसविलेले निजामशाहीच्या राजधानीचे शहर पुढे मलिक अहमदच्या नावावरून ‘अहमदनगर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आलेल्या या शहराच्या नावावरून जिल्ह्यालाही अहमदनगर जिल्हा म्हणून संबोधले जाऊ लागले.

चारही बाजूंनी मोठमोठे खंदक असलेला अहमदनगरचा भुईकोट किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात याच किल्ल्यात पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल व मौलाना आझाद यासारख्या नेत्यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. याच किल्ल्यात कैदेत असताना पंडित जवाहरलाला नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला.

सहकारी चळवळीत देशात महाराष्ट्र अग्रेसर असून अहमदनगर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे प्रवरानगर (लोणी येथे उभा राहिला. हा कारखाना आता ‘पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना’ म्हणूनच ओळखला जातो. सहकारी तत्त्वावरील सर्वाधिक साखर कारखाने राज्यात याच जिल्ह्यात आहेत.

‘अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ ही सहकारी क्षेत्रातील आशिया खंडातील सर्वात मोठी बँक ठरावी.