मैलापूर खंडोबा

मैलारलिंग याची गाव वस्ती २ हजार. हे २०० फूट उंचीच्या डोंगरावर दगडाच्या खालच्या भागात, दगडाचे खोबणीत मल्हारीची मूर्ती आहे व पुढे २०० फूट उंचीवर दगडाचे टोकावर ज्योत पेटविली जाते असे अवघड काम आहे. गावापासून २५’ चालल्यावर चढण लागते. देवस्थान २६० पायऱ्या चढून गेल्यावर लागते. तेथे वीज, पाणी आहे. रायचूर स्टेशनला उतरून मैलारलिंगला जाता येते. प्रत्येक वर्षी १४ जानेवारीला भव्य यात्रा भरते व लाखो भाविक दर्शनास येतात.

सर्वसाधारणपणे प्रत्येक घराण्यात कुलाचारानुसार आणि रीतिरिवाजप्रमाणे खंडोबाची उपासन केली जाते. सर्व साधारण माहिती खालीलप्रमाणे संकलित आहे.
सर्वसाधारणपणे श्री. खंडोबा हा मूळ भगवान शंकराचा अवतार आहे. त्याची उपासना शाळुंका व पिंड – तांदळा – मूर्ती – टाक व लिंग या स्वरूपात करतात. श्री खंडोबाची मूर्ती चत्‌र्भुज असून अश्वारूढ आहे. त्यास महाराष्ट्रात मल्हारी मार्तंड म्हाळसाकांत या नावाने व कर्नाटकात मल्लय्या या नावाने ओळखतात. खंडोबाच्या परिवारात कुत्र्याला स्थान असून तो भैरवाचा आवडता प्राणी आहे. खंडोबास रुद्राभिषेक केला जातो. त्यास महानैवेद्य म्हणून ठोंबरा (जोंधळे शिजवून त्यात दही मीठ घालून केलेला पदार्थ ), कणकीचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण याचा दाखविला जातो. तसेच पुरणपोळीचा पण नैवेद्य दाखविला जातो. खंडोबाची तळी भरली जाते. एका ताम्हनांत पान, सुपारी, भंडारा व खोबरे हे घेऊन येळकोट म्हणून तीन वेळा ताम्हन उचलून खाली ठेवतात. नंतर खोबऱ्याचे तुकडे करून भंडारा उधळला जातो. पाच पावले पुढे चालत गेल्यास क्षेत्र जेजुरीस गेल्याचे श्रेय मिळते. श्री मल्हारी वर्षातील खालीलप्रमाणे उत्सव साजरे केले जातात. चैत्री पौर्णिमेस खंडोबाने अवतार घेतला. श्रावणी पौर्णिमा हा बाणाई-मल्हारीचा विवाह दिवस तसेचह माघी पौर्णिमा म्हाळसाचे व खंडोबाचे लग्न पाली या क्षेत्री झाले व भैरवाचा वार मल्हारी मार्तंड हा शिवाचा अवतार म्हणून रविवार दिवस व वरील सर्व पौर्णिमा हे उपासना म्हणून धरले जातात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपाषष्ठी या ६ दिवसांत मल्लमणी यांचे युद्धात षष्ठीला दोन्ही राक्षसाचा वध केला म्हणून वरील ६ दिवसांत नवरात्र उत्सव केला जातो. वाघ्या मुरळी हे खंडोबाचे सेवेकरी. अपत्य प्राप्तीसाठी नवस करतात व त्यानुसार पहिले अपत्य देवास अर्पण करतात. त्यातील मुलास वाघ्या व मुलीस मुरळी म्हणतात.

मार्ग :-

मैलार लिंग जाण्यासाठी रायचूर रेल्वे स्टेसनवरून उतरून रस्त्याने जाता येते.