माझे दारिद्रय जाळ

दारिद्रयानं गांजलेला एक बाहेरगावचा ब्राम्हण भोज राजाच्या भेटीसाठी धारा नगरीस आला. नगरीत येताच प्रथम तो तिथल्या एका धर्मशाळेत उतरला. त्याने आपल्या थैलीत राजाला भेट देण्यासाठी उसाची सात-आठ पेरे आणली होती. धर्मशाळेत जेवण काढून घेतली, आणि त्यांच्या जागी अर्धवट जळून विझलेली लाकडे त्य थैलीत घालून ठेवली.

झोप झाल्यावर तो ब्राम्हण चूळ वगैरे भरुन त्या थैलीसह राजाकडे गेला व त्याने थैलीत उसाची पेरेच आहेत असे समजून आत अर्धवट जळालेली लाकडे असलेली ती थैली राजाच्या हाती दिली. राजसेवकाने ती थैली उघडून बघताच जेव्हा तिच्यात जळकी लाकडे असल्याचे दिसून आले तेव्हा राजा भोज रागानं लालबूंद झाला, तर तो ब्राम्हण भयानं लटपट कापू लागला.

ब्राम्हणाला कुणीतरी तोंडघशी पाडलं आहे हे हेरुन कालिदास पुढं सरसावून भोज राजा म्हणाला, ‘महाराज ! या ब्राम्हणानं ही जळकी लाकडं का आणली आहेत हे जर आपण समजावून घेतलंत तर आपला राग निश्चितच नाहीसा होईल, आणि याच्या विषयी आपल्या मनात करुणा उत्पन्न होईल.’

राजा आपलं म्हणणं लक्ष देऊन ऎकू लागला असल्याचं पाहून कालिदास पुढं म्हणाला, ‘ या ब्राम्हणाची व माझी इथे येण्यापूर्वी भेट झाली असता मी याला या लाकडाबद्दल विचारलं, तेव्हा तो म्हणाला, ‘अर्जुनानं कल्पवृक्षांनी भरलेलं खांडववन जाळलं; मारुतीनं सोन्याची लंका जाळली; आणि शंकरानं लोकांना प्रिय असलेल्या मदनाला जाळून भस्मसात केलं. थोडक्यात सांगायचं तर आजवर दारिद्र्याला मात्र कुणीच जाळले नाही. तेव्हा जगातल्या दारिद्र्याला जाळणारा महापुरुष केव्हा अवतरेल तेव्हा अवतरेल; सध्या महाराजांनी ही जळकी लाकडे घेऊन त्यांचे होमकुंड पेटवावे व त्यात निदान माझ्या घरचे तरी दारिद्र्य जाळावे.’

कालिदासानं दिलेलं हे स्पष्टीकरण ऎकून भोज राजा प्रसन्न झाला, आणि त्याने त्या गरिब ब्राम्हणाला पुरेसे धन देऊ केले व त्या्ची गरीबी दूर केली