मक्याच्या वड्या

साहित्य :

  • १ कप मक्याच्या कणसाचा कीस
  • दीड कप साखर
  • २ चमचा मिल्क पावडर
  • २ टे. चमचा तूप
  • ४-५ वेलदोड्याची पूड.

कृती :

तुपावर मक्याच्या कणसाचा कीस परतून घ्या. वाफ आणा. कीस शिजला की उतरा. साखरेत अर्धा कप पाणी घाल. गोळीबंद पाक करा. मिल्क पावडर मक्याच्या किसात मिसळा. त्यात वेळची पूड घाला. नंतर हे मिश्रण गोळीबंद पाकात घालून ढवळा. गोळा झाला की उतरवा व तूप लावलेल्या थाळीत थापा. नंतर वड्या पाडा.