ममता यांचा कलामांना फेसबुकवरुन पाठिंबा

ममता बॅनर्जी यांचे फेसबुक पेज

ममता बॅनर्जी यांचे फेसबुक पेज

डॉ. अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी समर्थन मिळविण्याच्या हेतूने तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आता आपला झेंडा फेसबुकवर नेला आहे. लाखो भारतीयांचे आवडते असल्याने डॉ. कलाम यांच्या समर्थनासाठी ममता यांनी शनिवारी फेसबुक पेज सुरु केले आहे.
‘भावी राष्ट्रपती म्हणून कोण निवडून यावा, यासाठी मी लाखो भारतीयांचा आवाज झाले आहे,’ असा संदेश त्यांनी फेसबुकवरून दिला आहे.

राष्ट्रपतिपदासाठी कलाम यांचे नाव ममता आणि मुलायमसिंह यादव यांनी एकत्र येऊन सुचवले होते. मात्र, प्रणव मुखर्जींना पाठिंबा देऊन समाजवादी पक्षाने ही यूती मोडून काढली आणि ममता यांना बाजूला सारले. ‘माझा पक्ष लहान आहे. इतर पक्षांप्रमाणे आमच्याकडे काही स्त्रोत नाही. सत्य आणि दृढ विश्वासाच्या मार्गावर आमचा पक्ष चालतो. आयुष्यभर मी माझ्या तत्वांसोबतच चालत आले आहे. माझ्या मतावर मी नेहमीच ठाम राहिले आहे,’ असे आपल्या निर्णयावर कायम राहत ममतांनी सांगितले. लोकशाहीत लोकांची इच्छाशक्तीच सर्वोच्च असते, असे सांगत ममता यांनी कलाम यांना मत करण्यासाठी जनतेकडे विनंतीची मागणी केली आहे.

‘तुमचा आवाज तीथपर्यंत पोहोचू द्या. मी वाकून लोकांच्या इच्छाशक्तीला नमस्कार करते,’ असेही त्यांनी फेसबुकवर ‘पोस्ट’ केले आहे.

डॉ. अब्दुल कलाम यांना पाठिंबा देण्यासाठी या पेजवर जा
www.facebook.com/Didi.Mamata.Banerjee