मंगळागौरीचे व्रत

श्रावण महिन्यात मंगळागौरीचे व्रत केले जाते. श्रावण महिन्यात येणार्‍या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात.

विषेत: नववधूसाठी हे व्रत असते. सुखी वैवाहिक आयुष्यासाठी हे व्रत केले जाते. नववधुनां पहिले पाच वर्ष मंगळागौर करावी लागते.

ब्राम्हण कूटूंबातील स्त्रिया हे व्रत करतात. रात्री मंगळागौरी पुजा केली जाते आणि त्यानंतर मंगळागौर रात्रभर जागवली जाते. यावेळी जमलेल्या महिला गाणी म्हणतात ,फेर धरतात. मंगळागौरीच्या निमित्ताने जमलेल्या माहेरवाशिणी मनातल्या भावना व्यक्त करुन मोकळ्या मनाने पुढच्या दिवसांना, संकटांना सामोर्‍या जायला सज्ज होतात.