मंगसुळी खंडोबा

मंगसुळी हे ठिकाण सांगलीपासून ३६ कि.मी. अंतरावर आहे. देवस्थान हे २ कि.मी. अंतरावर आहे. मंदिर हेमाडपंथी असून १ हजार वर्षापूर्वीचे आहे. चैत्र शु. १० ते पौर्णिमा असे ५ दिवस उत्सव असतो. चैत्र शु. १० लाच लंगर तुटते. ते लंगर पंचधातुमिश्रित लोखंडाचे असून २७ नक्षत्रांची २७ कडी ही साखळी स्वरूपात असतात. वर्षांच्या भाविष्याप्रमाणे कडीचा दगडावर प्रहार करतात व ती तुटते असे वर्षातून दोन वेळा होते.

या व्यतिरिक्त अजून २ उत्सव खालील तिथीस साजरे करतात. आश्विन शु. १ ते आश्विन शु. १० (दसरा) व मार्गशीर्ष शु. १ ते मार्गशीर्ष शु. ६ (चंपाषष्ठी) देवास पुरणपोळीचा व वांग्याचे भरताचा नैवेद्य दाखविला जातो. येथे नारळ वाढवितात. देवाचा मुख्य दिवस रविवार. त्या दिवशी छबिना निघतो. सदरचे देवस्थान कर्नाटक तसेच महाराष्ट्रात कुलदैवत म्हणून मानले जाते. देवस्थानला स्वतःचे उत्पन्न नाही. भक्तांच्या देणगीतूनच खर्च भागविला जातो. येथे एकुण २१ पुजाऱ्यांची घरे असून त्यांना बुडता असे म्हणतात. प्रत्येक वर्षास १ बुडता ५ जणांसह असून प्रत्येकास ५ वर्षांनंतर एकदा पूजेचा मान येतो व उत्पन्न वाटून घेतात. सदर ठिकाणी लग्न, मुंज व गुगुळ हे कार्यक्रम केले जातात.

लोकसंख्या (मंगसुळी) :-

१०,०००

जाण्याचे ठिकाण :-

जिल्हा बेळगांव, ता. अथणी, सांगली -मिरज- कागवाड बेडक मार्गे मंगसुळी, सांगली ते मंगसुळी ३६ कि.मी.