- बोगांडा दिन : मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक.
- युवा दिन : तैवान.
- राष्ट्रीय नौका दिवस
ठळक घटना
- १८४९ : ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीने पंजाब खालसा केले.
- १८५७ : क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या व इथूनच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला खरी सुरुवात झाली.
- १९६२ : भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले.
- १९६९ : भा. द. खरे यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर ‘अमृतपुत्र’ ही कादंबरी लिहिण्यास प्रारंभ केला.
- १९७० : दत्तो वामन पोतदारांने ‘शिवचरीत्र’ ह्या ग्रंथाच्या लेखनास प्रारंभ केला.
- २००४ : भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३०९ धावांची खेळी केली व त्रिशतक झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज झाला.
जन्म
- १९२९ : उत्पल दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता
मृत्यू
- १९६२ : करमचंद थापर, भारतीय उद्योगपती.
- १९६४ : शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक