मसाला भेंडी

साहित्य:

 • २ कापलेले कांदे
 • १ चमचा आले पेस्ट
 • १ चमचा लसूण पेस्ट
 • १/४ चमचा हळद
 • १ चमचा किसलेले नारळ
 • १ चमचा तीळ
 • १ चमचा मीठ
 • १ चमचा धणे पावडर
 • १ चमचा तिखट
 • ५ मोठे चमचे तेल
 • १/४ चमचे राई
 • १/२ चमचे मेथी
 • १/२ चमचे कलौजी
 • ३ कडीपत्ते
 • ५०० ग्रा. कापलेली भेंडी

कृती:

मसाला भेंडी

मसाला भेंडी

कांदा, लसूण, आले, हळद, नारळ, तीळ, मीठ, धणे, आणि तिखट मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.

तेल गरम करून राई, मेथी, कडीपत्ता आणि कलौजी फ्राय करावे.

नंतर बारीक केलेला मसाला टाकुन द्यावा आणि ३ मिनीट फ्राय करावे.

भेंडी टाकावी आणि ४-५ मिनीट शिजेपर्यंत फ्राय करावे. सर्विंग डिश मध्ये काढून घ्यावे व पराट्यांबरोबर गरम गरम द्यावे.