मसाला डाळ

साहित्य:

 • १ वाटी तुरीची डाळ
 • २ वाट्या पाणी
 • ३ चमचे ओले खोबरे
 • अर्धा चमचा जिरे
 • अर्धा चमचा मिरे
 • ४-५ सुक्या मिरच्या
 • ४ लवंगा
 • १ इंच दालचिनीचा तुकडा
 • १ चमचा धने
 • मीठ
 • ३ चमचे तेल
 • १ कांदा
 • अर्धे लिंबू किंवा २ टोमॅटो व कैरीच्या फोडी

फोडणीचे साहित्य:मोहरी, हिंग व हळद

कृती:

तव्यावर चमचाभर तेल घालून सर्व मसाल्याचे जिन्नस निरनिराळे भाजावे. एका ताटलीत काढावे. ओले खोबरे सर्वात शेवटी भाजावे. लवंगा व मिरे फुटताना उडतात व सुक्या मिरच्यांचा खकाणा उडतो. मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर थोडे पाणी घालून हे पदार्थ एकत्र वाटावेत. डाळ शिजवून घ्यावी. त्यात वाटलेले मसाला व मीठ घालावे. कांदा बारीक चिरावा व उरलेला तेलात फोडणीस टाकावा. जरा परतून डालीवर घालावा. खालीवर उतरवून लिंबाचा रस घालावा.

कैरी किंवा टोमॅटो वापरायचा असल्यास डाळीबरोबरच शिजवावा.