मसाला डोसा

साहित्य:

 • १ वाटी उडीद डाळ
 • २ वाटी तांदूळ
 • २ लहान चमचे मीठ
 • १/२ किलो बटाटा
 • १/२ लहान चमचा मोहरी
 • १/२ लहान चमचा हळद पावडर
 • १/२ लहान चमचा धणे पावडर
 • १/२ लहान चमचा आमसूल पावडर
 • १/२ लहान चमचा लाल मिरची पावडर
 • थोडीशी हिंग पावडर
 • तेल भाजण्यासाठी

कृती:

मसाला डोसा

मसाला डोसा

तांदूळ व डाळ वेग-वेगळे ८-१० तास भिजवून ठेवा. नंतर दोन्ही धुऊन वेगवेगळे मिक्सरमधून काढून घ्या. आता दोन्ही एकत्र करून चवीनुसार मीठ टाका. हे मिश्रण १२ तास झाकून ठेऊन द्या. उन्हाळ्यात मिश्रण लवकर आंबट पडते तरी ६ तासानंतर तपासून पहा. बटाटा उकडून चिरून घ्या. तेलात मिरीची फोडणी देऊन बटाटा व सर्व मसाले टाकून एकत्र करा. आता एका मोठ्या चपट्या तव्यावर डोसा भाजा. डोस्याच्या मधोमध बटाट्याचा मसाला घेऊन दुमडा व खोबर्‍याच्या चटणीबरोबर वाढा.

One thought on “मसाला डोसा

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>