मसालेदार खिचडी

साहित्य :

  • १ वाटी तांदूळ
  • अर्धी वाटी मुगाची डाळ
  • पाऊण चमचा मीठ
  • १ चमचा आमटीचा गोड मसाला (काळा)
  • अर्धा चमचा धणेजिरेपूड,
  • २ हिरव्या मिरच्या (उभ्या चिरून)
  • पाव चमचा तिखट
  • ३ चमचे तेल
  • अर्धा चमचा मोहरी
  • पाव चमचा हिंग
  • अर्धा चमचा हळद
  • पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • पाव वाटी ओले खोबरे (असल्यास)
  • ३ वाट्या गरम पाणी
  • १ चमचा साजूक तूप

कृती :

मसालेदार खिचडी

मसालेदार खिचडी

डाळतांदूळ मिसळून तासभर धुवून ठेवावेत. कुकरच्या पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद, मिरच्या क्रमाने घालून त्यावर डाळतांदूळ घालावेत. आंच कमी करून २-४ मिनिटे परतावेत. नंतर त्यात तिखट, मीठ, मसाला व गरम पाणी घालावे. कुकरमधे (साध्या किंवा प्रेशर) खिचडी शिजवावी. वाढताना वरून खोबरे व कोथिंबीर शिवरावी. चमचाभर साजूक तूप वरून सोडावे म्हणजे शिते मोकळी होतात.

घरात असल्यास, मूठभर शेंगदाणे, १-२ मध्यम कांदे किंवा बटाट्याच्या फोडी, मटारदाणे, भोपळी मिरची यापैकी खिचडीत काहीही घालता येते. मिरच्या घातल्यानंतर डाळ तांदूळ घालण्यापूर्वी यांपैकी असेल ती भाजी घालावी. दोन मिनिटे परतून डाळतांदूळ घालावेत, मात्र गरम पाणी अर्धी वाटी जास्त घालावे.