मसालेदार टिंडे

साहित्य :

 • ५०० ग्रॅम टिंडे
 • १ चमचा वाटलेले आले-लसूण
 • २ टोमॅटो
 • २ कांदे
 • १ चमचा लाल तिखट
 • ४ चमचे धनेपूड
 • १ चमचा गरम मसाला
 • ३ चमचे चिरलेली कोथिंबीर
 • दीड चमचा मीठ
 • ५ चमचे तेल
 • अर्धा चमचा मोहरी
 • अर्धा चमचा जिरे

कृती :

टिंडे धुवून त्याला फुलीसारख्या उभ्या-आडव्या चिरा द्याव्या. देठापर्यंत कापू नये. काही मंडळींना साल आवडत नाही. त्यांनी साल काढून भरल्या वांग्यांना भाजी चिरतो तशी चिरावी. कांदे, टोमॅटो बारीक चिरावे, मीठ, धनेपूड, तिखट, गरम मसाला एकत्र करून टिंड्यात भरावे. रुंद पातेल्यात किंवा कढईत तेल तापवावे. मोहरी व जिरे फोडणीस टाकून त्यावर कांदा गुलाबीसर परतावा. त्यावर आले-लसणाची गोळी घालून दोन मिनिटे परतून तिखट घालावे व सर्व मसाला नीट ढवळावा. त्यावर भरलेली टिंडे अलगद घालावीत. भाजीत पाणी अजिबात घालू नये. पण झांकणावर पाणी ठेवून भाजी मंद आंचेवर शिजू द्यावी.

वाढण्यापूर्वी वरून गरम मसाला व कोथिंबीर शिवरावी.