मसाल्याच्या करंज्या

साहित्य :

 • अर्धा किलो कणीक
 • १ डावभर डाळीचे पीठ
 • २ चमचे लाल तिखट
 • अर्धा चमचा हळद
 • अर्धा चमचा हिंग
 • १ चमचा जिरेपूड
 • २ पळ्या तेल
 • २ चमचे मीठ
 • अर्धा लिटर दूध
 • पाव वाटी रवा
 • ४०० ग्रॅम तेल

मसाल्याच्या साहित्य :

 • १५० ग्रॅम किसलेले सुके खोबरे
 • ५० ग्रॅम तीळ
 • अर्धा वाटी डाळीचे पीठ
 • ४ चमचे गोडा मसाला
 • पाव चमचा हिंग
 • १ चमचा मीठ
 • ७-८ हिरव्या मिरच्याचे तुकडे

कृती :

कणकीत डाळीचे पीठ, रवा, लाल तिखट, हळद, हिंग, मीठ जिरेपूड, २ पळ्या तेल गरम करून घालून कणीक दुधात घट्ट भिजवावी. मसाल्याच्या सारणासाठी सुके खोबरे व तीळ खंमग भाजून घ्यावेत. डाळीचे पीठ तेलावर भाजून घेतानाच ७-८ हिरव्या मिरच्याचे तुकडे भाजून घ्यावेत. त्यात गोड मसाला, हिंग, मीठ घालून सारण तयार करावे. नेहमीच्या करंज्याप्रमाणे करंज्या कराव्यात व तळाव्यात.