मसूर डाळ

साहित्य:

  • १ वाटी मसूर डाळ
  • ५-६ हिरव्या मिरच्या
  • ४ लसूण पाकळ्या
  • १ सें.मी. आले (बारीक तुकडा)
  • २ कांदे
  • २ बटाटे
  • २ टोमॅटो
  • अर्धी वाटी ओले खोबरे
  • अर्धा चमचा साखर
  • १ चमचा मीठ
  • ४ चमचे तेल किंवा तूप
  • अर्धा चमचा मोहरी
  • १ चमचा गरम मसाला पावडर

कृती:

मसूर डाळ

मसूर डाळ

मिरच्या, आले व लसूण जाडसर खरडावी किंवा कुटावी व डाळीत हा खर्डा घालून डाळ शिजवावी.

बटाटे उकडावे व टोमॅटो शिजवावे. कांदे सोलून बारीक चिरावे. बटाटे सोलून चिरावे.

डाळीत टोमॅटो, बटाटे, मीठ, साखर व खोबरे घालावे.

एका लहान पातेलीत तेल तापले की त्यात मोहरी घालावी.

कांदा घालून परतावा व गरम मसाला त्यात घालून ही फोडणी डाळीवर ओतावी.

५-७ मिनिटे डाळ मंद आंचेवर उकळू द्यावी. पोळी किंवा भाताबरोबर वाढावी.