मसूर डाळीची खिचडी

साहित्य :

 • १ वाटी तांदूळ
 • अर्धी वाटी मसूरडाळ
 • अर्धी वाटी गाजराचे तुकडे
 • अर्धी वाटी कोबी किंवा कॉलीफ्लॉवर (चिरलेला)
 • ४-५ छोटे कांदे (ऐच्छिक)
 • १ टोमॅटो
 • अर्धा चमचा जिरे
 • १ हिरवी मिरची
 • पाव चमचा हळद
 • दीड चमचा मीठ
 • २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
 • २ चमचे तूप
 • २ चमचे ओले खोबरे

कृती :

मसूर डाळीची खिचडी

मसूर डाळीची खिचडी

डाळ व तांदूळ वेगवेगळे धुवून ठेवावे. पातेल्यात तुपावर जिरे व मिरची फोडणीस टाकून त्यावर भाज्या, मीठ, हळद, टोमॅटो घालून ३-४ मिनिटे परतावे.

त्यात डाळ घालून ५ वाट्या गरम पाणी घालावे. उकळी आली की तांदूळ वैरावे (घालावे). दहा मिनिटांनंतर आंच कमी करावी व झांकण ठेवावे. मंद आंचेवर खिचडी शिजू द्यावी.

भाताची कणी शिजलेली दिसली की खाली उतरवून झाकूण ठेवावी. पाच मिनिटांनंतर कडेने चमचाभर साजूक तूप सोडावे.

वाढताना कोथिंबीर व खोबरे वर शिवरावे. पापड, लोणचे, दही व ताक याबरोबर ही खिचडी खावी.

पथ्य करणारांना तसेच रविवारी टीव्हीच्या वेळेला ही खिचडी सोयीची आहे.