मसुराचे लाडू

साहित्य :

  • २५० ग्रॅम मसुराच्या डाळीचा रवा
  • अर्धा नारळ
  • २५० ग्रॅम साखर
  • पाऊण वाटी डालडा तूप
  • ४-६ वेलदोड्याची पूड
  • २५ ग्रॅम बेदाणा
  • २५ ग्रॅम चारोळी.

कृती :

मसुराच्या डाळांचा गिरणीतून रवा काढून आणावा किंवाघरी मिस्करमधून काढावा.ओले खोबरे भाजा व बाजूला ठेवा. नेहमीप्रमाणे तुपावर रवा भाजा. त्यावर थोडा दुधाचा शिपका द्या व पुनः जरा भाजा व उतरून ठेवा. साखरेत १ वाटी पाणी घालून दोनतारी पाक करा. त्यात भाजलेला रवा खोबरे, बेदाणा, चारोळी व वेलदोड्याची पूड घाला. नीट ढवळा. उतरवा. तासाभराने लाडू वळा.