मसूरडाळीचे सूप

साहित्य :

  • १ वाटी मसूराची डाळ
  • २ मोठे कांदे
  • २ टोमॅटो
  • ४-५ लसूणपाकळ्या
  • ५ काळी मिरी
  • पाव चमचा तिखट
  • चवीनुसार मीठ

सजावटीसाठी :

  • अर्धीवाटी शिजवलेला भात
  • लिंबाच्या कापट्या व कोथिंबीर
  • ३ चमचे तेल

कृती :

कांदे व टोमॅटो बारीक चिरावेत. तेलावर चिरलेला कांदा परतावा. त्यावर टोमॅटो घालावेत. लसूण पाकळ्या व मिरी एकत्र खरडून त्यावर घालावी. दोन मिनिटे परतून त्यावर डाळ, मीठ व ६-७ कप पाणी घालावे. प्रेशर कुकरमध्ये शिजवावे. (साध्या पातेल्यात शिजवल्यास पाणी थोडे जास्त असू द्यावे.) बाहेर काढून गार झाले की मिक्सरमधून काढावे म्हणजे एकजीव होईल. पुन्हा मंद आंचेवर ३-४ मिनिटे उकळावे वाढताना चमचाभर भात सूप बोलमधे घालावा व त्यावर गरम सूप ओतावे. पिताना मीठ, मिरपूड व लिंबाची कापटी पिळून द्यावी. आवडीनुसार लोण्याचा ठिपका व कोथिंबीर घालून सजावावे.

हे सूप पौष्टिक आहे शिवाय पचायलाही हलके!