मसूर डाळ व पालकाचे सूप

साहित्य :

 • दीड वाटी बारीक चिरलेला पालक
 • तीनचर्तुथांश वाटी मसुराची डाळ
 • ३ टोमॅटो
 • ३ कांदे
 • १ कप दूध
 • ३-४ लसूण पाकळ्या
 • पाव चमचा तिखट
 • चवीनुसार मीठ व मिरपूड
 • १ लिंबाचा रस
 • हवे असल्यास ताजे लोणी.
 • कृती :

कांदे, टोमॅटो व पालक धुवून बारीक चिरावे. लसूण पाकळ्या किंचित ठेवाव्या. डाळ धुवून त्यात चिरलेल्या भाज्या व ८ कप पाणी घालावे व प्रेशरकुकरमध्ये शिजवावे. शिजल्यानंतर निवाले की मिक्सरमधून काढावे. त्यात मीठ,तिखट व मिरपूड घालून पुन्हा उकळावे. उकळी आली की गरम दूध त्यात घालून लगेच कपात घालावे. आवडीनुसार लोणी व २-४ थेंब लिंबूरस पिण्यास द्यावे.