मठरी

साहित्य :

  • दोन वाट्या जाडसर दललेली कणीक
  • १ चमचा जिरेपूड
  • २ टे. चमचा कलौजी (कांद्याचे बी)
  • ४ टे. चमचा डालडाचे मोहन
  • मीठ.

कृती :

सर्व एकत्र करून पीठ भिजवा. नंतर जाडसर पुऱ्या लाटा. त्याला जेवायच्या काट्याने टोचा म्हणजे पुरी फुगणार नाही. नंतर बेताच्या विस्तवावर पुऱ्या तळा.