मौखिक आरोग्य

आपल्या मौखिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिवसातून दोन वेळा दात घासावे. दात स्वच्छ करण्यासाठी कोळसा, मिश्री यांचा वापर करू नये. आहार हा संतुलित असावा. आहारात हिरव्या पालेभाज्या व गाजर, मुळा, काकडी यांचा समावेश असावा. शक्यतो गोड पदार्थ तसेच लहान मुलांना; चॉकलेट-गोळ्या देण्याचे टाळावे. दात किडल्यास त्यात अन्न अडकण्यास सुरुवात होते व दात दूखू लागतात. त्वरीत उपचार करावे व दंततज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सतत सुपारी, तंबाखू पानमसाला, गुटखा खाणे म्हणजे कॅन्सरला निमंत्रण होय; सतत सुपारी चघळण्यामुळे तोंडाच्या आत पांढरे व्रण उमटतात. दातांच्या एनॅमलवर परिणाम होऊन दात पिवळे पडातात व हिरड्या खराब होतात. सुपारी, तंबाखू, गुटख्यामध्ये असलेले टॉनेन, नायट्रोझामाईन कर्करोगजन्य पदार्थ निर्माण करतात. जास्त साखर व साखरेचे पदार्थही दंतक्षय निर्माण करतात.

नियमित तपासणी, वेळीच उपाय आणि नियमित दातांची निगा यामुळे मौखिक आरोग्य आपण जपू शकू.