मेदूवडा सांभर

साहित्य:

  • २ वाटी उडीद डाळ
  • १/२ वाटी हरभरा डाळ
  • १/२ वाटी तांदूळ
  • १ लहान चमचा मीठ
  • २ हिरव्या मिरच्या
  • १ तुकडा आले
  • तेल तळण्यासाठी

 

कृती:

मेदूवडा सांभर

उडीद डाळ, हराभरा डाळ व तांदूळ एका भांड्यात एकत्र १० तास भिजत ठेवा. नंतर धुऊन वाटून घ्या. मिश्रण जाडसर ठेवा. नाहीतर वडे तळायला अवघड जातील.

या मिश्रणात हिरवी मिरची, आले वाटून टाका. मीठ टाकुन व्यवस्थित एकत्र करा. हातावर थोडेसे तेल लावून मिश्रण टाका व चपटा वडा तयार करा.

याच्या मधोमध एक खड्डा करा व गरम तेलाच्या कढईत सोडा लाल-लाल तळून घ्या. सांभर व खोबर्‍याच्या चटणी बरोबर वाढा.

1 thought on “मेदूवडा सांभर

Comments are closed.