आपल्या कविता,लेख,पाककृती मराठीमातीवर प्रसिद्ध करा, आजच आपले साहित्य पाठवा.

मेथीचे घावन

साहित्य :

  • २ वाट्या ज्वारीचे पीठ
  • अर्धी वाटी डाळीचे पीठ (बेसन)
  • २ जुड्या मेथी
  • १ चमचे तिखट
  • २ चमचे मीठ
  • तेल

कृती :

दोन्ही पिठे तिखट व मीठ घालून पाणी घालून ३० मिनिटे भिजवून ठेवावी. मेथी धुवून बारीक चिरावी व त्यात घालावी. पाव चमचा सोडा घालावा. पीठ थलथलीत असू द्यावे. तव्यावर तेल सोडून धावन करावे. मेथीऐवजी कोथिंबीर किंवा कोबी किसूनही असेच घावन करता येतात.

वर्ग: , , ,

प्रतिक्रिया द्या

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *

*
*