मेथीचे पराठे

साहित्य:

  • २ कप कापलेली मेथीची पाने
  • १ मोठा कांदा कापलेला
  • २ कप पीठ
  • २ चमचे तिखट
  • ३ चमचे तेल
  • अर्धा चमचा हळद
  • १ चमचा गरम मसाला
  • एक लसूण
  • मीठ

कृती:

मेथीचे पराठे

मेथीचे पराठे

सर्व सामग्री कालवून पाण्याने कणिक तिंबा. लहान गोळे बनवा व जाड पोळ्या लाटून घ्या. तव्यावर तेल टाकून या पोळ्या शेका. काही लोक गव्हाच्या पीठा बरोबर १ कप बेसन मिसळून पण पराठे बनवितात.