मेतकूट

मेतकूट

मेतकूट

साहित्य :

  • २५० ग्रॅम चणाडाळ
  • ५० ग्रॅम उडीद डाळ
  • मूठभर तांदूळ
  • १ चमचा मोहरी
  • १ चमचा जिरे
  • ८-१० लाल सुक्या मिरच्या
  • अर्धा इंच सुंठेचा तुकडा
  • १ चमचा हळद
  • १ चमचा हिंग

कृती :

चणा डाळ, उडीद डाळ, तांदूळ, मोहरी, जिरे हे पदार्थ वेगवेगळे भाजावेत.

मिरच्या गरम असलेल्या कढईत ठेवाव्यात.

सुंठेचा तुकडा कुटून बारीक तुकडे करून हळद व हिंग हे सर्व पदार्थ एकत्र मिक्सरमध्ये बारीक दळावेत.

दळल्यावर पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावे व कोरड्या बाटलीत भरावे.

वसाळ्यात मेतकुटाचा फार उपयोग होतो.

2 thoughts on “मेतकूट

Comments are closed.