म्हर्‍हाटी

मराठवाड्याचे एक प्राध्यापक महोदय आपल्या मित्राला आपले शहर दाखवित होते.

एका इमारती जवळून जाताना मित्राने विचारले. “हे ग्रंथालय आहे वाटतं?”

“व्हयं,” प्राध्यापक उत्तरले.

काही वेळेनंतर एका इमारतीकडे बोट दाखवित मित्राने पृच्छा केली, “ही नाट्यगृहाची इमारत दिसतेय?”

“व्हयं”

काही वेळ ते असेच चालत राहिले

जराशयानं मित्र म्हणाला, “इथले रस्ते फारच अरूंद आहेत नाही?”

“व्हय”

प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादाखल ‘व्हयं’ हा शब्द ऐकून मित्र म्हणाला , “मित्रा, हे ‘व्हय’ काय प्रकरण आहे?”

’मराठवाड्यच्या ग्रामीण बोलीभाषेतला शब्द आहे हा, इथले अशिक्षित लोक ‘होय’ ला ‘व्हय’ म्हणतात.

“पण तू तर चांगला सुशिक्षित आहेस ना?”

“व्हय” प्राध्यापक महाशय म्हणाले.