म्हसोबाचे लग्न

एकदा म्हसोबाने आपले लग्न करण्याचा बेत ठरविला आणि लग्नासाठी सर्व जातीच्या प्राण्यांस आमंत्रण दिले. त्याप्रमाणे लग्नाच्या वेळी सगळे प्राणी वेळेवर हजर झाले. परंतु कासव येण्यास फार विलंब झाला. म्हसोबाने कासवास विचारले, ‘अरे, तुझ्यामुळे इतक्या प्राण्यांची खोटी व्हावी, हे तुला बरे वाटले का ?’ कासव म्हणाला, ‘देवा, आपले घर सोडून जाणे मला फारसे आवडत नाही; कारण स्वतःचे घर कसेही असले तरी त्यात जे सुख आहे, ते दुसरीकडे नाही. ’ या भाषणाचा म्हसोबास मोठा राग आला. मग त्याने कासवास शाप दिला की, ‘आजपासून तुझे घर तुझ्या पाठीवरच राहील.’

तात्पर्य:- आपला आळशीपणा लपविण्यासाठी पुष्कळ लोक भलत्याच गप्पा मारीत असतात, पण शेवटी त्यांची फजिती झाल्याशिवाय रहात नाही.