मोरेश्वर मोरगाव

मोरेश्वर मोरगाव

मोरेश्वर मोरगाव

निजे भूस्वानंद जडभरत भूम्या परतरे।
तुरीयास्तीरे परमसुखदेत्व निवससि ॥
मयुराया नाथ स्तवमसिच मयुरेश भगवान ।
अतस्त्वा संध्याचे शिवहरिरणी ब्रह्मजनकम ॥१॥

अर्थ – हे मोरगावच्या मयुरेशा तू जडभरतमुनिच्या भूमीमध्ये सर्वश्रेष्ठ अशा भूस्वानंद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, अक्ऱ्हा नदीच्या तीरावरील स्वतःच्या अत्यंत सुखदायी क्षेत्रात वास करतोस. निर्गुण, प्रणवाकृती, स्वयंभू, योगाच्या तुरिय अवस्थेत राहिल्यामुळे शिवशंकरांना ब्रह्मानंद देणाऱ्या मयुरेश्वरा, मयुर हे आसन असणाऱ्या तुला माझा नमस्कार असो. ब्रह्मदेवाने हे तुझे देवलय उभारले व रक्षणासाठी (दक्षिणेस) शंकर व (उत्तरेस) सूर्य यांना सिद्ध केले.

मय्रेश्वर मोरयाच्या मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वारावर वरील श्लोक लिहिलेला आढळेल. श्लोकत म्हटल्याप्रमाणे मयुरेश्वराच्या या मोरगावास भूस्वानंदभुवन असे मनले जाते. जसा विष्णूचा वैकुंठलोक, शंकराचा कैलास, तसा श्रीगणेशाचा स्वानंदलोक.

अष्टविनायकात मोरगांव हे प्रमुख मानले जाते. अष्टविनायकाची यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने करावयाची असेल तर ती प्रारंभी व शेवटी मयुरेश्वराच्या दर्शनानेच केली पाहिजे. चला तर मयुरेश्वराला साष्टांग नमस्कार करून अष्टविनायकाची संपूर्ण व सचित्र माहिती मिळवूया.

श्रीक्षेत्र मोरगावाचे भौगोलिक स्थान व मार्ग परिचय :-

पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात, कऱ्हा नदीच्या काठावर हे भूस्वानंदभुवन म्हणजे मोरगाव क्षेत्र आहे. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे आणि एके काळी येथे खूप मोर होते म्हणून या गावाचे नाव मोरगाव असे प्रचलित झाले. या क्षेत्रास जाण्यास अनेक मार्ग आहेत.

  • पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावरून एस.टी. गाड्या सुटतात.
  • पुणे सोलापूर महामार्गावर पुण्यापासून ५६ कि.मी. वर चौफुला फाट्यावरून उजवीकडे नीरामार्गावर मोरगाव क्षेत्र आहे. पुणे-हडपसर-लोणी-चौफुला-सुपा-मोरगांव हे अंतर ७९ कि.मी. आहे.
  • पुणे-हडपसर-सासवड-जेजूरी-मोरगाव हा ६४ कि.मी. चा दुसरा मार्ग आहे. महाराष्ट्राचे आद्यदैवत जेजुरीचा खंडोबा याचे दर्शन घेऊन मग पुढे मोरगांवी जावे.
  • जेजुरी रेल्वे स्टेशनवर उतरून एस.टी. ने मोरगावला जाता येते. जेजूरी ते मोरगाव अंतर १५ कि.मी. आहे.

श्री मोरेश्वर मोरगाव विषयी अधिक वाचा

1 thought on “मोरेश्वर मोरगाव

Comments are closed.