मोतीचुराचे लाडू

साहित्य :

  • २५० ग्रॅम डाळीचे पीठ
  • २ वाट्या पाणी (पीठ भिजवण्यासाठी)
  • २५० ग्रॅम साखर
  • ३०० ग्रॅम तूप
  • ५-६ वेलदोड्याची पूड
  • केशर
  • बदाम
  • बेदाणे.

कृती : डाळीचे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे. नंतर त्यात पाणी घालून पीठ भिजवावे. एकदम सगळे पाणी घालू नये. पिठात गुठळी होतील. नंतर बुंदीच्या लाडवाप्रमाणेच पाक करून घ्यावा. त्यात कळ्या टाकून वेलदोड्याची पूड, केशर, बदामाचे काप , बेदाणे घालून लाडू वळावे.