मुगाचे लाडू

साहित्य :

  • २५० ग्रॅम मुगाची डाळ
  • ३०० ग्रॅम साखर
  • १०० ग्रॅम खवा
  • १०० ग्रॅम डिंक
  • २५ ग्रॅम चारोळी
  • ५-६ वेलदोडे
  • पाऊण वाटी दूध व तूप.

कृती :

मुगाची डाळ ३ ते ४ तास भिजत घाला. नंतर उपसून वाटून घ्या. चारोळी कोरडी जरा भाजून घ्या. डिंक कुटून घ्या व तळून घ्या. खवा थोड्या तुपावर परतून घ्या.वाटलेली डाळ तुपावर परतावी. बदामी रंगावर आली की त्यावर दूध शिंपडावे व पुनः जरा वेळ परतावी.साखरेत पाऊण वाटी पाणी घाला व पक्का पाक करा. नंतर त्यात डाळ घालून ढवळा लगेचच उतरवा.नंतर त्यात खवा, तळलेला डिंक, चारोळी, वेलदोड्याची पूड घालून ढवळा व मिश्रण निवले की १५-२० मिनिटांनी लाडू वळा.