मुगाचे व उडदाचे मिश्र लाडू

साहित्य ;

  • २ वाटी मुगाची डाळ
  • २ वाटी उडदाची डाळ
  • १ वाटी पांढरे तीळ
  • दीड वाटी तूप
  • ४ सपाट वाट्या पिठीसाखर
  • ५-६ वेलदोड्याची पूड.

कृती :

उडदाची व मुगाची डाळ एकत्र करूनगिरणीतून रवा काढून आणावा. तीळ भाजून पूड करावी. नेहमीप्रमाणे रवा तुपावर भाजा. बदामी रंगावर आलाकी उतरवा. मिश्रण गार झाले की त्यात पिठीसाखर, तिळाची पूड, वेलदोड्याची पूड घाला व लाडू वळा