मुगाच्या डाळीच्या चकल्या

साहित्य :

  • २५० ग्रॅम मुगाची डाळ
  • २ टे. चमचा धनेजिरे पूड
  • १ टे. चमचा तीळ
  • १ चमचा ओवा
  • २ चमचे तेलाचे मोहन
  • तिखट
  • मीठ
  • हळद
  • थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • थोडेसे डाळीचे पीठ.

कृती :

मुगाची डाळ २ ते ३ तास भिजत घाला. नंतर स्वच्छ धुवून कुकरात ठेवून शिजवावी. अगदी थोडे पाणी घाला. नंतर ही डाळ डावेने घोटावी. त्यात इतर वस्तू घालून घट्ट होण्यापुरते डाळीचे पीठ घाला. नंतर नेहमीप्रमाणे चकल्या करा.