मुरक्कु दाक्षिणात्य चकल्या

साहित्य :

  • ३ वाट्या तांदूळ
  • अर्धी वाटी उडदाची डाळ
  • १ चमचा जिरे
  • १ चमचा मिरे
  • मीठ
  • लोण्याचे मोहन

कृती :

तांदूळ व डाळ वेगवेगळी भाजावी. जिरे व मिरे त्यातच घालून भाजावी. नंतर गिरणीतून दळून आणा.नंतर त्यात मीठ व लोण्याचे मोहन घालून पीठ बिजवा व चकल्या करा. काही ठिकाणी ह्या चकल्याचे पीठ नारळाच्या दुधात भिजवतात. ह्या चकल्यात तिखट, हळद, हिंग काहीही घालावयाचे नाही.