मशरूम पुलाव

साहित्य:

  • २ वटी तांदूळ
  • १ डबा मशरूम
  • २५० ग्रॅम पनीर
  • ३ कांदे
  • २ ढोबळी मिरची
  • २ गाजर
  • १ लहान चमचा मीठ
  • १/२ लहान चमचा गरम मसाला
  • ५ चमचे तूप

कृती:

मशरूम पुलाव

मशरूम पुलाव

तांदूळ धुऊन स्वच्छ करून तासभर भिजवा. मशरूम धुऊन बारीक व लांब चिरुन घ्या. पनीर चौकोनी चिरुन तळून घ्या. कांदा, ढोबळी मिरची, गाज्रर बारीक व लांब चिरुन घ्या. एका पातेल्यात तूप गरम करा. कांदा टाकून परता. कांदा गुलाबीसर झाल्यावर गरम मसाला, मीठ व मशरूम टाकून शिजवा. आता ढोबळी मिरची, गाजर व पनीर टाका. तांदूळ टाकून ४ वाटी पाणी टाका व गॅस कमी करुन झाकून शिजवा. शिजल्यावर गरम-गरम वाढा.