मटर पुलाव

साहित्य:

 • १ कप बासमती तांदुळ
 • १ कप हिरवे मटार
 • २ कप पाणी
 • २ मोठे चमचे तूप
 • २ लवंग
 • कापलेला टोमॅटो
 • १ कापलेला कांदा
 • तेजपान
 • २ छोटी विलायची
 • १/२ चमच जिरे
 • १/२ चमच गरम मसाला
 • मीठ

कृती:

मटर पुलाव

मटर पुलाव

बनविण्याच्या ३ मिनीट आधी तांदळास पाण्यात भिजवावे नंतर पाणी काढून फेकावे. तूप गरम करून कांदा लालसर भाजावा. नंतर लवंग, तेजपान, विलायची आणि जीरे टाकुन दोन मिनीट फ्राय करावे.

मटार, टोमॅटो गरम मसाला आणि मीठ टाकुन २-३ मिनीट फ्राय करून तांदुळ टाकावे.

२ मिनीटानंतर २ कप पाणी टाकावे आणि गॅस कमी करून पाणी सुकेपर्यंत शिजवावे.

पाणी सुकल्यानंतर गॅस बंद करावा.