मटण चॉप्स

साहित्य :

  • १ किलो मटण
  • ३ चमचे व्हिनेगर
  • ६ लसूण पाकळ्या
  • १ मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा
  • अर्धा चमचा मिरचीपूड
  • मीठ
  • तेल
  • ३ मोठे कांदे

कृती :

मटण चॉप्स

मटण चॉप्स

मटणाचे लहान लहान तुकडे करा. ते एखाद्या जाड लाकडी गोळ्याने किंवा लाकडी हातोड्याने चिरडून सपाट करा.

मटणात व्हिनेगर, आले-लसूण पेस्ट आणि मिरचीपूड मिक्स करा. हे मिश्रण दहा-बारा तास शक्यतो फ्रिजमध्ये ठेवा.

त्यानंतर या मिश्रणातून मटण वेगळे करा. तळणाचे तेल गरम करून त्यात मटणाचे तुकडे दोन्ही बाजूंनी थोडे तळून घ्या.

आच कमी करून मटणात पूर्वीचे मिश्रण, मीठ आणि मिरी घालून ५-१० मिनिटे शिजवा. मटण प्लेटमध्ये काढून घ्या.

तळणाच्या तेलात गोल चिरलेला कांदा तळून मटण चॉप्सवर पसरवा. ग्रेव्ही किंवा रस्सा तयार करण्यासाठी चॉप्समध्ये अर्धा कप पाणी घालून ते शिजवा.

त्यातील ग्रेव्ही घट्ट होऊन तांबूस रंगाची झाली की, ते खाली उतरवा आणि गरमागरम सर्व्ह करा.