नाना साकारणार प्रकाश बाबा आमटे

द रिअल हिरोची टीम

द रिअल हिरोची टीम

‘प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो’ या सिनेमाची घोषणा नुकतीच समृद्धी पोरे यांनी केली. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन त्याच करणार आहेत. या सिनेमात नाना पाटेकर प्रकाश आमटेंची भूमिका करणार आहेत आणि मृणाल कुलकर्णी मंदा आमटे यांची भूमिका करणार आहेत.

या सिनेमाची खूप मोठी टीम आहे. कॅमेरामन महेश लिमये, मेक अप आर्टिस्ट विक्रम गायकवाड अशी सगळी मंडळी सिनेमाच्या आखाड्यात असतील. याशिवाय, डॉ. मोहन आगाशे यांचा बाबा आमटे यांच्या भूमिकेसाठी विचार सुरु आहे. ‘इतरांनीही माझ्या कामावर सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आले होते. आम्ही समृद्धी यांची तयारी पाहिली. त्या गेल्या दोन वर्षांपासून अभ्यास करत आहेत. त्यांच्या कामाची प्रामाणिकता पाहून आम्ही या सिनेमाला परवानगी द्यायचे ठरवले. आणि ही भूमिका नाना करणार असल्यामुळे सोन्याहून पिवळं,’ असे त्यावेळेस प्रकाश आमटे म्हणाले.

नाना पाटेकर आमटे कुटुंबीयांच्या जवळचे असल्यामुळे ही भूमिका ते अतिशय उत्तमपणे साकारतील, असा समृद्धी यांनी विश्वास व्यक्त केला.