बाबांच्या भूमिकेत नाना

बाबा आमटे आणि नाना पाटेकर

बाबा आमटे आणि नाना पाटेकर

बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित एक फियेचर फिल्म बनणार आहे. नाना पाटेकर हे बाबा आमटे यांच्या भूमिकेत आपल्याला दिसतील. हा चित्रपट अडीच तासाचा असून संगीत दिग्दर्शिका व निर्मात्या माधुरी अशीरगडे यांच्या झिरो माईलस्टोन फिल्मच्या वतीने हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे. ३० जूनला या चित्रपटाच्या स्क्रीप्टचे वाचन होईल. या भूमिकेसाठी नाना पाटेकर यांची निवड करण्यात आली कारण नानाचे व्यक्तिमत्व बाबा आमटेंशी मिळते-जुळते आहे. शिवाय नानाचे बाबांशी भावनिक संबंध होते त्यामुळे ही भूमिका करायला नाना नक्की होकार देतील असे आशावाद माधुरी अशीरगडे यांनी व्यक्त केले आहे. ज्येष्ठ लेखक सुरेश द्वादशीवार यांनी पटकथा लिहिली आहे. आनंदवन, सोमनाथ, भामरागड, मुंबई ही ठिकाणे बाबांच्या संबंधात आहेत व या सर्व ठिकाणांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. हा चित्रपट कवयित्री, लेखिका, गायिका असलेल्या माधुरी अशीरगडे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्या चित्रपटाला संगीत देणार आहेत. ‘आई शपथ’, ‘तांदळा’ यांनतर हा चित्रपट त्यांचा तिसरा प्रोजेक्ट आहे. माधुरी अशीरगडे यांना आई शपथ या चित्रपटाच्या कथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.