नारळाची चटणी

साहित्य :

  • अर्ध्या नारळाचा चव(किसलेला नारळ)
  • पाव वाटी चणा डाळ
  • ६ हिरव्या मिरच्या
  • अर्धा चमचा मोहरीची पूड
  • १ वाटी दही
  • चवीनुसार मीठ
  • २ चमचे तेल
  • पाव चमचा मोहरी
  • एक अष्टमांश चमचा हिंग
  • १०-१२ कढीलिंबाची पाने
  • पाव चमचा हळद (घातली नाही तरी चालेल)

कृती :

आदल्या रात्री दोन्ही डाळी वेगवेगळ्या भिजत घालाव्या. सकाळी उपसून ठेवाव्या. तेल तापले की त्यावर मोहरी, हिंग व हळद घालून दोन्ही डाळ फोडणीस टाकाव्या. जरा ढवळून आंच कमी करावी व झाकण ठेवावे. अधूनमधून ढवळावे. मिरच्या व कढीलिंब चिराव्या, डाळी अर्धवट शिजल्या की त्यात मिरची-कढिलिंबाचे तुकडे घालावे. पुन्हा जरा परतून झाकण ठेवावे. डाळी शिजत आल्या की त्यात खोबरे घालावे व दोनतीन मिनिटे परतावे. मीठ घालून ढवळावे व चटणी उतरवून गार होऊ द्यावी. निवाली की त्यात दही घालून कालवावी व वाढावी.