अण्णा यांनी बनवली नवी टीम

अण्णा हजारे

अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी घोषणा केली की, भ्रष्टाचारविरोधीची लढाई अजूनही चालूच आहे. पण आता १३ नव्या सदस्यांनी ही खूप मोठी जबाबदारी पेलण्याचे ठरविले आहे. पुढच्या वर्षी जानेवारी पासून ही टीम देशभर फिरुन या लढाईला सुरुवात करेल.

एका पत्रकार परिषदेत अण्णा यांनी या नव्या टीमची घोषणा केली. या परिषदेत किरण बेदी व ‘नर्मदा बचाव आंदोलना’च्या मेधा पाटकर उपस्थित होत्या. या परिषदेत अण्णांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘२०१४ उजाडण्यापूर्वी जनलोकपाल बील आणा नाहीतर तुमची पराभव निश्चित आहे. या गोष्टीचा देशभरात प्रचार करुन लोकांना जागे करण्यात येईल. यात बदल करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. कोणी आपल्या शेतकऱ्यांकडे पाहिले का? ते मरणाच्या दारात उभे आहेत. या समस्येवर सरकार काय काहीही करीत नाहीये. उलट परदेशी कंपन्यांना आमंत्रण देऊन त्यांचे शोषण करीत आहे. त्यांची जमीन हडपण्याचा सरकारला कोणताच अधिकार नाही.

दरम्यान, ‘टीम अण्णा’च्या लढाईत लष्करप्रमुख व्ही. के. सिंह सहभागी होणार आहेत.