सणांसाठी उडान ची खास नविन उत्पादने

श्रमिक नागरी संघ उडान ची नविन उत्पादने

श्रमिक नागरी संघ उडान ची नविन उत्पादने

दिवाळी दसरा या सणांचा मूहर्त साधून अनेक कंपन्या आपली उत्पादनं बाजारात आणत असतात. श्रमिक नागरी संघाने ही उडान य उपक्रमाद्वारे खास सणांसाठी हस्तकला वस्तूंची नविन उत्पादने बाजारात आणली आहे. यात आकर्षक पणत्या, कंदील, बनावटी फुलांच्या माळा, तोरण, पाकिटे, उश्यांचे कव्हर, ज्युट बॅग्ज, मेणबत्या, की चेन, चटया, रूम फ्रेशनर्स, या वस्तुच्या समावेश आहे. या सर्व वस्तू आदिवासी महिलांना बनविल्या असून आखीव रेखीव कलाकुसरी मूळे नेहमी पेक्षा या वस्तु जरा हटके दिसतात. उडानची उत्पादने भारतातील सर्व प्रमुख स्टोअर्स मध्ये विक्रिसाठी उपलब्ध आहेत.

श्रमिक नागरी सघांने आदिवासींच जीवमान उंचवण्यासाठी उडान हा उपक्रम सुरु केला आहे. आदिवासी स्त्रीयांकडे कौशल्य असूनही त्यांचा आर्थिक स्तर हा इतर स्त्रीयांच्या तुलनेत खालावलेला आहे. त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उपक्रमा मागचा मुख्य हेतु आहे. या उपक्रमा अंतर्गत केवळ खाद्य पदार्थांवर भर न देता त्यांना हस्तकलेच्या वस्तू बनवण्याचं प्रक्षिशण देण्यात आलं.

या स्त्रीयांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तु अंत्यंत आकर्षक असल्याने जगभरातून या वस्तुंना मागणी असते. भारतातल्या टाटा, रिलायन्स, विप्रो, पटनी कम्प्युटर यासारख्यां नामवंत कंपन्यांनी तर आपल्या सामाजिक उपक्रमांत या उत्पादानांचा समावेश केला आहे. या कंपन्यांमध्ये प्रदर्शानात वर्षभर ही उत्पादने ठेवली जातात.

‘उडान’ च्या नविन उत्पादनांची छायाचित्रे
[nggallery id=112]

1 thought on “सणांसाठी उडान ची खास नविन उत्पादने

Comments are closed.